Pune : युवा आक्रोश पदयात्रा अडविली ; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पुणे : महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या यासह महत्वाच्या विषयाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे लालमहल ते मुंबई विधानसभा अशी युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात येणार होती.
युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली लालमहालापासून मुंबई विधान भवनाकडे निघालेल्या युवा आक्रोश पदयात्रेला आज शिवाजीनगर येथे पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत अडवले आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसने ही पदयात्रा बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, महिलांनी सुरक्षित वाटावे, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी सुरू केली होती. मात्र, सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी ही यात्रा थांबवून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. हे आंदोलन कोणत्याही हिंसेशिवाय शांततेच्या मार्गाने पुढे नेले जात असताना, पोलिसांनी केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, सह प्रभारी एहसान खान, बंटी शेळके, सोनललक्ष्मी घाग, प्रशांत ओगले, श्रीनिवास नालमवार, वैष्णवी किराड, मीडिया अध्यक्ष अक्षय जैन, अजित सिंह, विजय चौधरी, प्रथमेष आणावे, ऋत्विक धनवट, अमोल दौंडकर, सौरभ आमराले, महेश टावरे,चंद्रशेखर जाधव, उमेश पवार, कौस्तुभ नवले, राहुल शिरसाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





