Pune: युवक काॅंग्रेसचे ‘रस्ता रोको’ आंदोलन; अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे – पुणे शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्याच्या निषेधार्थ व भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांना आसाम पोलीसांनी बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करत रस्ता रोको करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र युवक काँग्रेस सहप्रभारी एहसान खान, पुणे शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील, प्रथमेश आबनावे, पुणे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पवार, मेघश्याम धर्मावत, आनंद दुबे, ऋषीकेश वीरकर, अभिजित चव्हाण, सद्दाम शेख, मुरलीधर बुधराम, धनराज माने, मारुती तलवारे, हर्षद हांडे, पवन खरात आणि युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

