पुणे : युवा कार्यकर्ते गौरव घुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे – युवा कार्यकर्ते गौरव घुले व ज्येष्ठ उद्योजक गणेश घुले यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घुले यांनी पक्षात प्रवेश केला. घुले यांच्यासह कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अय्याज काझी यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, पालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष निलेश निकम, तसेच बाळासाहेब बोडके, सुरेश घुले, माजी नगरसेवक राजू सानेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरव घुले हे बालाजीनगर परिसरातील प्रभाग 49 मधून इच्छुक असून, त्यादृष्टीने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता घुले हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखी वाढणार असल्याचा विश्वास यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांवर व पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याचे गौरव घुले यांनी सांगितले.





