Pune News : मित्रांनो पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. पुण्याजवळ असणाऱ्या अनेक सुंदर आणि आकर्षित पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बरेच पर्यटकांची इच्छा असते तर आम्ही 10 निवडक असे पर्यटन स्थळांन बाबबीत माहिती खाली सविस्तर दिली आहे. मित्रांनो जर का तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात राहायला आवडत असेल तर आयुष्यात एक वेळेस तरी या ठिकाणाला नक्की भेट द्या. पुण्याजवळील काही निवडक नयन रम्य पावसाळी पर्यटन स्थळे : 1. लोणावळा – लोणावळा हे पुण्यापासून 64 किमी तर मुंबईपासून 96 किमी अंतरावर आहे. लोणावळ्यात पर्यटक फार दुरून विश्रांतीसाठी येत असतात, आपल्या सुट्टीचा आनंद घेतात. लोणावळ्यात भुशी धरण, भाजे लेणी, राजमाची पॉइंट, लॉयन्स पॉइंट, टायगर पॉइंट वा टायगर लिप, इमॅजिका थीम पार्क असे काही पॉइंट लोणावळ्याला आहेत. सह्याद्रीच्या कुशीत असलेले लोणावळा या ठिकाणी उंच झाडी, खोल दर्या, पावसाळ्यात उंच डोंगरांवरून कोसाळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. त्याचमुळे लोणावळ हे प्रेक्षणीय स्थळ लोकांचे नेहमीच आवडिच ठरल आहे 2. ताम्हिणी घाट – सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला हा ताम्हिणी घाट म्हणजे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. हा घाट पुणे ते कोकण प्रवास करत असताना लागतो मुळशीच्या थोड पुढे गेले की महाडच्या दिशेने जातांना हा घाट लागतो, चोहिकडे डोंगर, दर्या, हिरवळ, ओसंडून वाहणारे धभडबे, वळनाचे रस्ते पाहायला मिळतात. सोबतच मानगांव जवळच देवकुंड धबधबा आहे तिथूनच पुढे 3 किलोमिटरच्या अंतरावर कुंडलीका व्हॅली आहे. हा सर्वत्र प्रदेश वर्षभर हिरवागार असतो व वार्षिक सरासरी तापमान 19 ते 33 अंश सेल्सिअस इतके असते. ताम्हिणी घाटात गेल्यावर राहण्यासाथी रिसॉर्ट आहेत व हॉटेल्स सुद्धा या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकता. 3. पवना लेक – पवना लेख हे पुण्याजवळ सुंदर व आकर्षित ठिकाण आहे. हे लोणावळा रेल्वे स्थानकापासून 20 किमी इतक्या अंतरावर आहे पवन लेख हा एक कुत्रीम तलाव आहे. पवना नदीवर बांधलेल्या पवना धरणातून पवना तलाव तयार होतो जो कॅम्पिंग, फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट्स यासारख्या अनेक साहसी उपक्रमांसाठी ओळखला जातो. 4. माथेरान – माथेरान हे पुण्यापासून जवळ जवळ जवळ 100 किमी च्या अंतरावर आहे तर मुंबई पासून 110 त्यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी सुद्धा असते, महाबळेश्वर नंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानचा नंबर लागतो. माथेरान म्हटले म्हणजे टॉय ट्रेन आलीच ह्या टॉय ट्रेन म्हदे बसल्या नंतर मोहक निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकता , ही ट्रेन 21 किमी धावते. सन 1900 मध्ये सुरू झाली होती. 5. माळशेज – माळशेज हे हिल स्टेशन पुण्यापासून 128 किमी अनतरावर आहे . तिथे अनेक तलाव, डोंगर, धबधबे ,हिरवेगार वनस्पति आणि प्राणी यांच्या मुळे माळशेज घातकहे सौंदरय अजून फुलून येते. हिरव्यागार टेकड्या आणि आकर्षक गुलाबी फ्लेमिंगोसह पावसाळ्यात हे ठिकाण विशेषतः सुंदर असते. 6. महाबळेश्वर – महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे, महाबळेश्वर हे पुण्यापासून 117 किमी अंतरावर आहे . महाबळेश्वर येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उद्याने श्वास रोखायला लावणारी दृश अश्या सुंदर प्रेक्षणीय स्थळ पर्यंटंकांना आकर्षित करते . हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला ,तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत. 7. भिमाशंकर – भिमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. हे पुण्यापासून 128 किमीच्या अंतरावर आहे . येथे पुराण देवस्थान आहे , भिमाशंकरचा आजूबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलानी व्यापलेला आहे. सर्व डोंगर प्रेमीचा आणि ट्रेकर्सचा हा आवडत ट्रेक आहे . 8. सिंहगड – सिंहगड हा पुण्यापासून 29 किमी अंतरावर आहे . सिहगड किल्ला हा मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जातो . पुण्यापासून सिंहगड जवळच असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी पुणेकऱ्याची धाव सिहगडाकडे जास्त प्रमाणात असते. 9. मळवली – पुण्यापासून लोणावळा जाताना मळवली हे ठिकाण लागते पुण्यापासून मळवली साधारण 59 कमी अंतरावर आहे. मळवलीत पावसाळ्यात भाजे धबधब्याला पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते मळवली परिसरात भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी, तसेच मराठा साम्राज्याचा इतिहासात उल्लेख असलेले लोहगड व विसापूर हे किल्ले प्रसिद्ध आहेत. 10. लोहंगड – लोहंगड किल्ला हा पुण्यापासून 68 किमी अंतरावर आहे . लोहंगड किल्ला हा शेजारच्या विसापूर किल्याला एका छोट्या रांगेने जोडलेला आहे. पावसाळ्यात ह्या किल्ल्यावर धुक्याची पांघरून घातली जाते, निसर्गाने वेढलेला हा संपूर्ण परिसर आहे.