Pune Weather : पुणेकरांना दिलासा! आकाशात काळ्या ढगांची पळापळ; पारा ‘या’ कारणामुळे घसरला
Pune Weather : पुणे शहरात दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव; कमाल तापमानात ४ ते ५ अंशांची घट झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा.

Pune Weather – आज दिवसभर शहरात ऊन आणि काळ्या ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळला. दुपारी उन्हाचा चटका आणि चारनंतर काळे ढग आकाशात पळत होते. अशा वातावरणामुळे उष्णता कमी जाणवत होत परंतु, उकाडा कायम होता. रात्री हवेतील गारवा वाढल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. पुणे शहराचा पारा ४३ अंशापर्यंत पोहचला होता.
मागील आठ ते दहा दिवसांत उन आणि ढगाळ वातावरणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने कमाल तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाली. गुरूवारी (दि. ७) लोहगाव येथे सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर शिवाजीनगर, मगरपट्टा, हडपसर, कोरगाव पार्क याठिकाणीही उष्णतेचा पारा ३७ ते ३८ अंशांपर्यंत खाली आला.
सध्या, दिवसाचे तापमान स्थिरावले असले तरी सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा चटका जाणत आहे. तर दुपारी चारनंतर आकशात ढग दाटून येत आहेत. सायंकाळच्या सुमारास सुखद गारवा निर्माण होत आहे. आजही दुपारी चारच्या सुमारास आकाशा काळे ढग भरून आले. त्यामुळे पाऊस हजेरी लावणार असे वाटले. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने हुलकावणी दिली.
उपनगरासह जिल्ह्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान, पुढील दोन-तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, दुपारनंतर आकाश ढगाळ राहील तर कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.





