Pune Weather: पुणे गारठले! सलग तिसऱ्या दिवशी तापमानात मोठी घट; ‘या’ भागात थंडीची लाट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सलग तिसऱ्या दिवशी थंडीचा पारा दोन ते तीन अंशाने घटल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागात पुन्हा थंडीची लाट आली आहे. कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले असून, गुरूवारी (दि. ८) एनडीए परिसरात सर्वात कमी ७.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. बहुतांश भागात किमान तापमान एक आकडी झाला आहे.
गायब थंडीचे पुन्हा आगमन झाले असून, १४ ते १५ अंशावर पोहचलेले किमान तापमान गेल्या तीन दिवसांत ७ अंशापर्यंत खाली आले. त्यामुळे एनडीए आणि हवेली परिसरात थंडीची लाट आल्यासारखी स्थिती आहे. पाषाण, शिवाजीनगर आणि बारामती परिसरातही थंडीचा पार एक आकडी आला आहे.
जिल्ह्यातही किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील तर किमान व कमाल तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
किमान तापमान
एनडीए ७.७, हवेली ८.२, माळीण ८.७, पाषाण ९.३, शिवाजीनगर ९.५, बारामती ९.८, दौंड १०, तळेगाव ११, आंबेगाव ११.६, हडपसर १२.१, गिरीवन १२.७, कुरवंडे १३.१, कोरेगाव पार्क १४, चिंचवड १५.४, मगरपट्टा १६.२ अंश सेल्सिअस





