pune: विश्रांतवाडी, विमानतळ, खराडीत पाणी बंद

जलवाहिनी स्थलांतरासह अन्य दुरुस्तीची कामे
पुणे : जागतिक बँकेच्या मुख्य जलवाहिनीच्या स्थलांतराचे काम आणि होळकर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत यंत्रणेची दुरुस्ती तसेच गळती काढण्याची कामे एकाच वेळी पिंपरी-चिंचवडमधील निगडी भक्ती-शक्ती चौक येथे करण्यात येणार आहे.
यामुळे पुणे महापालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या अनेक भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. २३) पूर्णपणे बंद राहणार आहे.
शुक्रवारी (दि. २४) संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा उशिराने आणि कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन लष्कर पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
या भागात राहणार पाणी बंद
बंडगार्डन विभाग : म्हस्के वस्ती, गणेशनगर (बोपखेल), कळस माळवाडी, जाधववस्ती, विश्रांतवाडीचा काही भाग, संजय पार्क, बर्माशेल परिसर, पुणे विमानतळ परिसर तसेच खराडीचा काही भाग. हरी गंगा टाकीवरून पाणीपुरवठा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, अहिल्यानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर, हरीगंगा सोसायटी, माप्रेस, समाजकल्याण वसतिगृह, विश्रांतवाडी पोलीस लाइन, आरोग्य भवन, शांतीनगर, भारतनगर, कतारवाडी, प्रतिकनगर, जेसिडी पार्क, वृंदावन सोसायटी, उत्तम टाऊनशिप, मित्तल सोसायटी, ड्रीम सोसायटी, जाधवनगर, पंचशीलनगर, श्रमिकनगर, कामगारनगर आणि चंद्रमानगर. चतु:श्रृंगी विभागांतर्गत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा परिसर, ॲम्युनिशन फॅक्टरी, मुळा रोड परिसर आणि भोईटे वस्ती.





