pune : मतदार यादी विभाजनाचे काम लवकर करावे
Updated On:

पुणे – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयामार्फत सुरू आहे.
या कामाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयांमधील मतदार यादी विभाजनाचे काम तपासले.
यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना हे काम अल्पावधित आणि अचूकतेने पूर्ण करण्याचे निर्देश दिवटे यांनी दिले.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार यादीची अंतिम तयारी जलद गतीने करण्याकडे प्रशासनांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.





