पुणे : येरवडा येथे वाहनांची तोडफोड; दहशत पसरविण्याचा प्रयत्न
Updated On:

येरवडा- येथील गाडीतळ येथे वाहनाची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असून एक चारचाकी वाहन, 5रिक्षा,5 दुचाकी वाहनावर दगड, पालघन सारखे हत्याराने काचा फोडल्या आहे.
मुख्य रस्त्यावरील रिक्षा तसेच आतील गल्ली बोळातील वाहनावर तसेच नागरिकांच्या घरावर हत्यारे मारून दहशत माजविण्याचा प्रकार केला आहे.
घराबाहेर पाणी साठविण्यासाठी ठेवलेले ड्रमसुध्दा फोडले आहे. याठिकाणी सातत्याने असे प्रकार घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित आहे.





