पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा दि. 8 जानेवारी रोजी होत आहे. या पदवीप्रदान समारंभात 1 लाख 9 हजार 930 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केले जाणार आहेत. पदवीप्रदान समारंभास कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत पदवीप्रदान सोहळ्याची तयारी सुरू आहे. विद्यापीठात 22 हजार 362 जणांना पदवी प्रदान केली जाणार आहे. तर 116 जणांना सवर्णपदक देऊन गौरविले जाणार आहे. उर्वरीत 87 हजार 586 विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर पदवी प्रदान केली जाणार आहे. पदवीप्रदान सोहळ्यात उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यापीठाने मागील पदवीप्रदान सोहळ्यातील पोशाखात बदल केल्याने, हा समांरभ आता चर्चेत राहत आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आता पदवीप्रदान समारंभात पायजमा, कुर्ता हा पारंपरिषक पोशाख असणार आहे.