Pune: पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांची बदली

पुणे – पुणे विभागासह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रजनी किरण क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, बुक्के यांना नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही.
विधी व न्याय विभागाने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पुणे या विभागांतील सह धर्मादाय आयुक्तांच्या बदल्या केल्या. त्यानुसार मुंबई मुख्यालयाच्या धर्मादाय सह आयुक्त रूबी उल्हास मालवणकर यांच्या जागी पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लांबे यांची नियुक्ती झाली.
छत्रपती संभाजीनगरचे धर्मादाय सह आयुक्त संजय कुलकर्णी यांच्या जागी नागपूर येथील जिल्हा न्यायाधीश क्र.४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली. लातूर विभागाच्या धर्मादाय सह आयुक्तपदी मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश सासने यांची नियुक्ती झाली.





