Pune Traffic Police : शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगावर लगाम घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीट दुचाकींविरोधात विशेष मोहीम हाती घेत मोठी कारवाई केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार तसेच सह पोलीस आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि वाहतूक दाटीच्या भागांमध्ये एकाच वेळी कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल १,४५४ ट्रिपल सीट वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी २,१४४ चलन तात्काळ पेड करून घेण्यात आली असून, त्यातून १६,१८,४०० इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे. याशिवाय विविध नियमभंगांबाबत एकूण ५,९२१ चलनांची कारवाई करण्यात आली.