Pune Shiv Jayanti | शिवजयंती निमित्त शहरातील मध्य भागात वाहतूक बदल

Pune Shiv Jayanti| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील मध्यभागात १९ फेब्रुवारी रोजी (सोमवारी) वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवजयंती निमित्ताने मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येतात. यामुळे प्रामुख्याने बाजीराव रस्ता, कुमठेकर, केळकर व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग –
१) जिजामाता चौक येथुन शिवाजी रस्ता वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
२) गणेश रस्ता – दारुवाला पुलाकडुन फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक – दारुवाला पुल चौकातुन वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल.
३) केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकते नुसार वळविण्यात येणार आहे.
४) मिरवणुक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड वरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतुन वळविण्यात येईल.
५) पुरम चौकातुन बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालक पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील.
६) मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
७) मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.
८) मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहनांना शनिवार वाड्याकडे न जाता येणार नाहीत. या वाहचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जावे.
९) स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहचालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छित स्थळी जाता येईल.





