Pune : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सारसबाग परिसरातील वाहतूक मार्गात बदल

पुणे – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था व राजकीय कार्यकर्ते सारसबाग येथील ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा येथे मिरवणूक काढून पुष्पहार अर्पण करतात.
या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर अनुयायांची गर्दी होत असून, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी काही मार्गांमध्ये बदल जाहीर केला आहे. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या सूचनेनुसार १ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून पुढीलप्रमाणे वाहतूक बदल लागू असतील.
बंद रस्ते कोणते :
जेधे चौक ते सारसबाग दरम्यानचा मार्ग वाहतुकीसाठी बंद.
जेधे चौक फ्लायओव्हरवरून सारसबागकडे जाणारी वाहने थांबवण्यात येणार.
वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेडसेपरेटर मधून वाहतुकीस मनाई.
सावरकर चौक ते पुरम चौक दरम्यानची वाहतूक बंद.
दांडेकर पुल / सिंहगड जंक्शन वरून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद.
पुरम चौक ते जेधे चौक मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
दांडेकर पुल – सावरकर चौक दरम्यान वाहतूक संध्याकाळी ३ ते रात्री १२ पर्यंत शिथिल करून दुहेरी मार्गाने वळवली जाईल.
निलायम ब्रिज वरील वाहतूक पर्वती गाव मार्गे वळविण्यात येईल.
पर्यायी मार्ग कोणते :
जेधे चौकाकडून सिंहगड रोड – सातारा रोड – व्होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक मार्गे.
सिंहगड रोडकडून स्वारगेट – दांडेकर पुल – नाथ पै चौक – फडके चौक – पुरम चौक – टिळक रोड – जेधे चौक.
कात्रजकडून सारसबाग – लक्ष्मीनारायण चौक (व्होल्गा चौक) – डावीकडे वळून पुढे.
वेगा सेंटरपासून – घोरपडी पेठ उद्यान – राष्ट्रभूषण चौक – हिराबाग चौक मार्गे.
नाथ पै चौक – कल्पना हॉटेल – टिळक रोड मार्गे इच्छित स्थळी जावे
सावरकर चौक – दांडेकर पुल – कल्पना हॉटेल – पुरम चौक – टिळक रोड.
शिवाजी रोड वरील वाहतूक गरजेनुसार वळविण्यात येईल.
सेव्हन लव्हज चौक – जेधे चौक वाहतूक गरजेनुसार वळवली जाईल.
सातारा रोडकडून मित्रमंडळ चौक – सावरकर चौक येणारे दुचाकीस्वार पाटील प्लाझा येथे वाहन पार्किंग करावे
वाहतूक पोलिसांकडून विनंती करण्यात आली आहे की, सर्व नागरिकांनी बदललेल्या मार्गांचा वापर करावा व पोलिसांना सहकार्य करावे. अत्यावश्यक सेवा वाहने (रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन) वगळता इतर वाहनांवर निर्बंध राहतील. परिस्थिती नुसार आणखीही तात्पुरते बदल करण्यात येऊ शकतात.





