पुणे ते पंढरपूर एसटी सेवा दोन दिवस बंद
Updated On:

पुणे – पंढरपूर येथे सोमवारी (31 ऑगस्ट) रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) पुणे ते पंढरपूर सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर खुले करण्यासाठी सोमवारी विविध संघटनांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर एसटीची सेवा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते.
याच अनुषंगाने रविवारीदेखील गाडी धावली नसून, सोमवारी पुणे-पंढरपूर सेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.




