Pune | पुणे ते दानापूर स्पेशल गाडीच्या फेऱ्या वाढवल्या
Updated On:

पुणे, – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे विभागाकडून पुणे- दानापूर विशेष दैनंदिन गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामध्ये गाडी क्रमांक ०१४८१ पुणे- दानापूर स्पेशल येत्या २३ डिसेंबरपर्यंत ३० फेऱ्या होतील. ही ट्रेन पुण्याहून सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता दानापूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४८२ दानापूर- पुणे स्पेशल २५ डिसेंबरपर्यंत ३० फेऱ्या होतील. दानापूरहून सकाळी साडेसहा वाजता गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.
या गाडीला दौंड कॉर्डलाइन अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबे आहेत. या अतिरिक्त गाडीमुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.





