Pune : ही परंपरा युवकांनी जपावी

पुणे : एम्प्रेस गार्डन येथील पुष्प प्रदर्शनाचा हा वारसा आजच्या युवकांनी देखील जपावा. पुण्याला लाभलेला हा वारसा आपण जपलाच पाहिजे, असे मत जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो २०२५ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. दिवसे यांच्या हस्ते झाले. या वेळी द अॅग्री – हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार, संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, विश्वस्त अनुपमा बर्वे, सुमन किलोस्कर, डॉ. श्रीनाथ कवडे, बाळासाहेब शिवरकर, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते. बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम बागेत राबविले जातात. ज्यातून सर्वसामान्य व्यक्तीला निसर्ग व पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल व प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल.
या उद्देशाने अॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था 1830 पासून कार्यरत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.




