पुणे : सैनिकाला मिळाले नवे हृदय ; नागपूर येथून ग्रीन कॉरिडॉरने आणले पुण्यात
Updated On:

पुणे विभागातीलसहावे हृदयरोपण
पुणे – पुण्याच्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) मध्ये दाखल झालेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला नागपूरमधील एका 31 वर्षीय मेंदूमृत महिलेचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. बुधवारी हे हृदय विमानाने पुण्यात आणण्यात आले.
हवाईदलातील 39 वर्षीय जवान हा चार महिन्यांपासून हृदयाच्या आजाराने “एआयसीटीएस’ दाखल होता. नागपूरहून या महिलेचे हृदय “आयएएफ एएन-32′ या विमानातून एअरलिफ्ट करण्यात आले.
सिव्हिल प्रशासनाने तयार केलेल्या ग्रीन कॉरिडॉरमधून हृदय नागपूरहून पुण्यात हलवण्यात आले आणि अतिशय वेगाने ते पुण्यात आणले आणि 39 वर्षाच्या सैनिकावर ते प्रत्यारोपित केले. पुणे विभागात हे सहावे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले आहे.





