पुणे : सिक्युरिटी सुपरवायझर मारहाण ; गाडीची काच फोडली

पुणे : जुन्या रागातून मेट्रोचे काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत ते सोडविण्यासाठी गेलेल्या सिक्युरिटी सुपरवायझरला लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केल्याचा प्रकार येरवडा येथील नदीपात्रात घडला.
याप्रकरणी जयंत बबन पिसाळ (५२, कवडे वस्ती, वाघोली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोल्डया उर्फ सचिन गवळी (३०, मंगेश (२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २३ डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता ताडीगुत्ता नदीपात्र येरवडा येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयंत पिसाळ हे मेट्रोच्या कामाकरिता नेमण्यात आलेल्या सिक्युरिटीचे सुपरवायझर आहेत. आरोपी गोल्ड्या आणि मंगेश यांनी जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी काम करत असलेल्या जे. कुमार इन्फ्रोप्रोजेक्ट लि या कंपनीतील कामगारांना धक्काबुक्की केली.
तसेच कंपनीची महेंद्रा बोलेरो कॅम्पर गाडीची काच लाकडी दांडक्याने फोडत नुकसान केले. तसेच फिर्यादी पिसाळ यांना सुद्धा लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करत बघून देण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहे.





