पुणे : जनरल बिपीन रावत यांना हडपसरवासीयांनी वाहिली श्रद्धांजली

हडपसर : धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी व नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या वतीने भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सोबत असलेल्या 13 शहीद जवानांना हडपसर गांधी चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
याप्रसंगी सैन्यात राहून देशसेवा केलेले जवान अविनाश ढोले, बाबासाहेब बोरकर, सुखदेव शिंदे, संभाजी निगडे, नानासाहेब थोरात, शिवाजी कात्रीन, महालिंग मोहीमकर यांनी उपस्थित राहत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच नगरसेवक मारुती आबा तुपे, महेश ससाणे, नितीन ससाणे, ओंकार तुपे, कुणाल चौरे, सतीश भिसे, नागेश जगताप, विजय नायर, राहुल धेंडे, मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान चे कार्यकतेही यावेळी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले आहे.या अपघात बिपीन रावत यांच्यासह पत्नी मधुलिका रावत आणि इतर 13 जणांचा मृत्यू झाला. भारताच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी पेलणाऱ्या बिपीन रावत यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मारुती आबा तुपे, नगरसेवक, हडपसर.





