पुणे : शहरात थंडीचा कडाका वाढला
Updated On:

पुणे : शहरातील किमान तापमान पुन्हा 10 अंशापर्यंत खाली आल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: एनडीए, पाषाण, हवेलीच्या काही भागात हुडहुडी भरणारी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे.
गुरूवारी (दि. 28) शहराच्या मध्यवर्ती भागात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर उपनगरातील काही भागात 10 ते 11 अंशांच्या आसपास किमान तापमान होते.
दरम्यान, पुढील दोन दिवस शहरातील आकाश निरभ्र राहील. त्यामुळे थंडीचा जोर कमी-अधिक असेल. तर त्यानंतर अधून-मधून आकाश ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.





