Pune : तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीच्या घरात
Updated On:

पुणे : ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे शहरातील वाढलेल्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले. बुधवारी (दि. ११) जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे सर्वाधिक ३२.९ तर शहरातील मगरपट्टा परिसरात ३१.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
रात्री साडेआठनंतर उपनगरातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या.पुढील दोन दिवस शहरातील आकाश अंशत: ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल. पुढील तीन ते चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.




