Pune : पोलीस अधिक्षक पंकज देशमुख पुणे अप्पर पोलीस आयुक्तपदी

पुणे : पुणे पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी बरेच बदल केले असून तीन अप्पर पोलिस आयुक्तांना अन्यत्र हलवले आहे. याचवेळी ग्रामीण पोलीसचे अधिक्षक पंकज देशमुख यांची शहर पोलीस दलात पदोन्नतीने अप्पर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांची मुंबईला गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस
आयुक्तपदी, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांची अमरावती पोलीस आयुक्तपदी, अप्पर पोलीस
आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांची नागपूरला अप्पर पलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली. या बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि. १६) रात्री काढण्यात आले.
नव्याने येणारे अधिकारी
नाव – कोठून – कोठे
१) पंकज देशमुख – पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण ते अप्पर पोलीस आयुक्त, पुणे
२) संजय बी. पाटील – अप्पर पोलीस आयुक्त, नागपूर ते अप्पर पोलीस आयुक्त, पुणे
३) राजेश बनसोडे – पोलीस अधीक्षक, बिनतारी, पुणे ते अप्पर पोलीस आयुक्त, पुणे
४) अमोघ गावकर – पोलीस उपायुक्त, प्रतिबंध, बृहन्मुंबई ते पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, प्रशासन, पुणे
५) जी. श्रीधर – पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ते पोलीस उप महानिरीक्षक, पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, पुणे
६) विजय मगर – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर ते पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे




