PUNE: सीईटी परीक्षा रद्दच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे उपोषण
Updated On:

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी आणि येत्या १० जानेवारी रोजी होणारी सीईटी रद्द करण्यात यावी, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विधान भवनासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
महाज्योतीच्या अधिछात्रवृत्तीसाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र, ही परीक्षा रद्द करुन ती १० जानेवारीला घेण्यात येणार आहे. हीच परीक्षाच रद्द करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच २०२३ वर्षात अर्ज करणाऱ्या व पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती मिळावी. तसेच ही अधिछात्रवृत्ती नोंदणी केलेल्या तारखेपासून मिळावी, त्यासाठी उपोषण करण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
टॅग्स:





