पुणे – विद्यार्थ्यांना मिळणार माहिती पुस्तिका

अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू : 1 लाख पुस्तिका वाटपासाठी तयार

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांकरिता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना 25 मे नंतर माध्यमिक शाळांमधून माहिती पुस्तिका उपलब्ध होणार आहेत. यंदा 1 लाख पुस्तिका वाटपासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत.

प्रवेशासंदर्भात अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून याचेही नियोजन करण्यात आले आहेत. यानंतर झोननिहाय पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहेत. टप्प्याटप्प्याने आता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊ लागली आहे. या विभागात एकूण 301 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यातील 298 महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून उर्वरित तीन महाविद्यालयांकडूनही लवकरच नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्वच विभागांसाठी एकूण पाच लाख माहिती पुस्तिकाची छपाई बालभारतीकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी या पुस्तिका प्राप्त झाल्या आहेत. पुणे विभागातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालय, हडपसर येथील एस.एम.जोशी महाविद्यालय, भावे हायस्कूल, आकुर्डीतील म्हाळसाकांत महाविद्यालय या चार ठिकाणी बालभारतीकडून पुस्तिका पोहोचविण्यात आल्या आहेत. या ठिकाणाहून नऊ झोनला पुस्तिका वितरीत करण्यात येणार आहेत. शाळांनी आपआपल्या झोनमधून दोन दिवसात पुस्तिका शाळांमध्ये घेऊन जाण्याबाबच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. प्रवेशासाठी पात्र असलेले विद्यार्थ्यांनी शिकत असलेल्या माध्यमिक शाळेतून माहिती पुस्तिका मिळवावी. या पुस्तिकेची किंमत 150 रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे. झोन प्रमुखांनी माध्यमिक शाळांना तात्काळ 22 मे रोजी पुस्तिकांचे वाटप करावे.

संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक व शाळांसाठी सुलभ प्रक्रिया असणार आहे. यादृष्टीने यंदाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिकेही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. आताची पुस्तिका सोप्या भाषेत असून सर्वसामान्यांना समजणारी आहे. फ्लो चार्टद्वारे तत्काळ प्रक्रिया समजून घेता येते. विद्यार्थी, पालक, शाळा यांच्यासाठी स्वतंत्रपणे सूचना नमूद करण्यात आलेल्या आहेत. पूर्वी पुस्तिके मराठी व इंग्रजी भाषा असे दोन भाग केले जात होते. आता मात्र मराठी व इंग्रजी अशी समोरासमोरच्या पानावरच माहिती देण्यात आली आहे. सवीस्तर प्रस्तावनाही देण्यात आली आहे. ठळक बाबीही नमूद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षा व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी प्रवेशासाठी योग्य नियोजन करुन त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याला प्राधान्य दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here