pune : भटक्या श्वानांची होणार पुन्हा गणना

नव्याने समाविष्ट ३२ गावांचाही प्रथमच समावेश
pune : शहरातील भटक्या श्वानांची नेमकी संख्या निश्चित करण्यासाठी महापालिका नव्याने गणना करणार आहे. यावेळी पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील भटक्या श्वानांचीही गणना होणार असून, यासाठी वर्षाचा कालावधी लागणार आहे.
भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. पालिकेकडून नियमित लसीकरण आणि नसबंदीची मोहीम राबविली जात असली, तरी श्वानांची संख्या कमी होत नाही.
दुसरीकडे, भटक्या श्वानांवरील अत्याचार तसेच श्वानांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिक आणि प्राणीप्रेमी यांच्यात वाद निर्माण होतात. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने शहरातील भटक्या श्वानांची अद्ययावत गणना करण्याचे ठरविले आहे.
यासाठी निविदा मागविल्या असून या कामावर २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा मिळणाऱ्या संस्थेला विशेष मोबाईल ॲप विकसित करावे लागणार आहे.
त्या च्या माध्यमातून प्रत्येक रस्ता, गल्ली, सोसायटी, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या श्वानांची नोंद होणार असल्याची माहिती पालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.





