Pune : कधी थंडी तर मध्येच ढगाळ वातावरण

पुणे : शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेत गारवा आहे. गेल्या ४८ तासांत बदलत्या हवामानामुळे किमान व कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवेली तालुक्यात एक ते दोन अंशांनी वाढ झाल्यामुळे रविवारी (दि. १२) किमान तापमान १३.६ तर शिवाजीनगर परिसरातील किमान तापमानत १५.५ अंशांवर पोहचले.
शहरासह जिल्ह्यात सततच्या हवमान बदलामुळे कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती झालेली आहे. मागील आठ दिवसांत किमान तापमानही एक ते दोन वेळाच ९ अंशापर्यंत खाली आले. त्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी पडलीच नाही. त्यातही एनडी, पाषाण, औंध, वारजे, कोथरूड आणि शिवाजीनगर परिसरातच काहीसा थंडीचा जोर असून, अन्य परिसरात थंडी गायब आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत किमान तापमानात एक ते दोन तर काही भागांत तीन अंशांनी घट झाली आहे.
त्यामुळे १० अंशांवर असलेले किमान तापमान १३ अंशांवर, तर जास्तीत जास्त २० अंशांवर किमान तापमान पोहचले. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे काही भागात गारवा जाणवत होता. पुढील चार दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे, आकाश निरभ्र तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
परिसर आणि किमान तापमान (अंश सेल्सिअस)
हवेली आणि एनडीए- १३.६, लोणावळा- १४.७, शिवाजीनगर- १५.५, पाषाण-१५.६, दौंड – १६.३, भोर- १६.४, बारामती-१६.८, राजगुरूनगर-१७.३, कोरेगांव पार्क- १८.५, मगरपट्टा- १९.२





