पुणे : शरद पवार हे जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री झाले होते

सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना प्रत्युत्तर
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता ‘त्यांनी वयाच्या 38 व्या वर्षी बंड केलं. मी 60 व्या वर्षी बाजूला झालो, अशा शब्दात टीका केली होती. या टिकेचा खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे,
शरद पवार हे 38 व्या वर्षी सर्वात युवा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कतृत्वामुळे आणि जनतेच्या आशिर्वादामुळे ते मुख्यमंत्री झाले. शरद पवार हे घराणेशाहीमुळे मुख्यमंत्री झाले नाहीत, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणार असल्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावरही खासदार सुळे यांनी भाष्य केले. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. काहींची बोलण्याची पद्धत वेगळी असते.
महाविकास आघाडीविरुद्ध महायुती, अशी लढत होणार आहे. तर, त्यांचा उमेदवार असणारच, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जर अजित पवार यांचे ऐकत असतील तर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यावी, असे आव्हान सुळे यांनी अजित पवार यांना दिले.





