PUNE: शरद मोहोळ खून प्रकरणाचा सूत्रधार गणेश मारणे ताब्यात

पुणे – गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला गुन्हे शाखेने संगमनेर परिसरातून बुधवारी सायंकाळी (दि. ३१) ताब्यात घेतले. मारणे दोन साथीदारांसह नाशिक रोड येथून पळून जाताना पोलिसांनी ही कारवाई केली.
या खून प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मारणे याने न्यायालयात अर्ज केला होता. अंतरिम अटकपूर्वची जामिनाची मागणी फेटाळत अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षाला बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात दि. ५ जानेवारी रोजी शरद मोहोळचा खून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली हाेती.
मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींनी आम्ही गणेश मारणे टोळीतील आहोत, असा आरडाओरडा केला होता. मारणे पसार झाल्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होते. संगमनेर परिसरातून बुधवारी सायंकाळी मारणेसह तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. गु्न्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.





