पुणे : शरद मोहोळ टोळीच्या गुंडाकडून एनजीओ चालवणाऱ्या महिलेसह दोघींचे अपहरण

पुणे – कुख्यात गुंडाला पुणे स्टेशन भागात स्टॉल मिळवून देण्याचं आमिष दाखवत दोन महिलांनी त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र त्याला स्टॉल मिळालाच नाही. पैसा आणि स्टॉलही न मिळाल्याने चिडलेल्या या गुंडाने दोन महिलांचे थेट अपहरण करत त्यांना डांबून ठेवले.
पैसे मिळाल्याशिवाय सुटका करणार नाही असा दमही भरला. दरम्यान गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनला हा प्रकार समजता काही तासातच या महिलांची सुटका करत चारह आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. ही घटना कात्रज ते उत्तमनगर दरम्यान घडली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (45 , सरडे बाग उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते (39, गणेशनगर ) प्रदीप प्रभाकर नलवडे (38 , भूगाव), अक्षय मारूती फड , (24 रा. वारजे) यांना अटक केली आहे. यातील बाबूलाल मोहोळ हा शरद मोहोळ टोळीचा गुंड आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 9 ते 10 गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान पीडित महिला या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या एक समाजसेवी संस्था चालवतात . त्यातून त्यांची बाबूलाल याच्याशी ओळख झाली होती. त्यांनी बाबुलालला पुणे स्टेशन परिसरात स्टॉल मिळून देतो असे सांगितले होते. बाबुलाल मोहोळ याने देखील यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्यावेळी महिलेला बाबूलाल याने जवळपास 6 लाख रुपये दिले. मात्र, पैसे देऊनही त्याला स्टॉल मिळाला नाही. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तरीही पैसे काही ळित नव्हते.
दरम्यान बाबुलाल व त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून संधीत हिला आणि तीच्या सहकारी महिले अपहरण केले. त्यांना स्वत:च्या राहत्या घरात डांबून ठेवले होते. त्यानंतर महिलेच्या कुटुंबाला फोन करून सतरा लाख रुपयांची खंडणी मागीतली . पैसे न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली.
त्यामुळे कुटुंब प्रचंड घाबरले होते. त्यांनी लागलीच गुन्हे शाखेकडे धाव घेतली.पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली. खंडणी विरोधी पथकाने तपास सुरू केला.
दरम्यान, या महिलांना उत्तमनगर परिसरातील एका आरोपीच्या घरात डांबून ठेवल्याची माहिती पोलीस नाईक शंकर संपते यांना मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आरोपीच्या घरावर छापा सत्र राबवत या दोन महिलांची सुखरूपरित्या ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, सहायक फौजदार विजय गुरव, पोलीस कर्मचारी शंकर संपते, विजय गुरव, प्रदिप शितोळ, विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, सैदोबा भोजराव राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.





