सूर्यग्रहण पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी; ढगाळ वातावरणामुळे निराशा
Updated On:

पुणे – सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यात नियमितपणे होणाऱ्या प्रकाश आणि सावलीच्या लपंडावामुळे 2019 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज दिसणार होते. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांची निराशा झाली आहे. यामुळे निसर्गाच्या अद्भुत घटनेचा आनंद घेण्याची पुणेकरांची संधी हुकली.
“नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन’ने गुरुवारी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी “सूर्यग्रहणासोबत चहापान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त सकाळी 8 ते 11 या वेळेत बालगंधर्व जवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सूर्यग्रहणासोबत पाहता येणार होते. सूर्यग्रहण पाहण्यासाठी बालगंधर्व पुलावर लहानांपासून वृद्धांपर्यंत गर्दी केली होती. परंतु ढगाळ वातावरण असल्यामुळे सर्वांचीच निराशा झाली.





