Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
Updated On:

Pune | पुणे शहरातील विविध भागात देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे पुणे शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर उद्या म्हणजेच ४ एप्रिल रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे:
पर्वती जलकेंद्र
वडगाव जलकेंद्र
भामा आसखेड जलकेंद्र
गांधी भवन टाकी परिसर
पॅन कार्ड क्लब टाकी परिसर
एनडीटी पाणीपुरवठा केंद्र
चतुर्श्रुंगी
लष्कर
वारजे
पाषाण
या सर्व परिसरातील पाणीपुरवठा असणार आज पूर्णतः बंद असणार आहे.





