Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! रामनवमीनिमित्त पुण्यातील ‘हे’ मुख्य रस्ते राहणार बंद; पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या
Pune News : आज रामनवमी निमित्ताने पुणे शहरातील महत्वाचे रस्ते बंद असणार आहेत. वाहनधारकांनी पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Pune News : पुणे शहरात राम नवमी उत्सवानिमित्त आज वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शोभायात्रांमुळे शहरातील काही मुख्य रस्ते दुपारी 4 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
बंद राहणारे मुख्य रस्ते: बाजीराव रोड. लष्कर परिसरातील रस्ता Pune News
Pune News : पुणेकरांनो लक्ष द्या! रामनवमीनिमित्त पुण्यातील ‘हे’ मुख्य रस्ते राहणार बंद
बाजीराव रोड परिसर :पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.
या मार्गावरील वाहतूक टिळक रोड – अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक मार्गे वळवण्यात येणार आहे.
लष्कर परिसर : वाय जंक्शन येथे वाहतूक बंद.
एम.जी. रोडवरील वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथून उजवी किंवा डावी वळण देण्यात येईल.
महंमद रफी चौकानंतरची वाहतूक ईस्ट स्ट्रीट मार्गे वळवण्यात येणार आहे. कोहिनूर हॉटेल परिसरातून जाणारी वाहतूक भोपळे चौक व इतर पर्यायी मार्गांनी वळवली जाईल.
वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





