PUNE : राज्याच्या काही भागांत पाऊस पुन्हा सक्रीय होणार

पुणे – राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याची चर्चा असताना हवामानशास्त्र विभागाने मात्र पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी याबाबत शनिवारी रात्री माहिती दिली.
त्यांनी म्हटल्यानुसार, “उत्तर ओडिसा आणि बंगाल उपसागरच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याच्या प्रभावाने मान्सूनच्या शाखा सक्रीय होऊन महाराष्ट्रात हलका ते मध्यम बऱ्यापैकी जोरदार पावसाची शक्यता आहे. यात प्रामुख्याने कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांत पावसाची शक्यता आहे. याबाबत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, 31 जुलै आणि आणि 1 ऑगस्टदरम्यान हा मध्यम पाऊस असेल. त्यानंतर दि. 2 आणि 3 ऑगस्टदरम्यान पावसाच्या प्रमाणात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे.’





