Pune : शहरात पुढील चार दिवस पावसाचे

पुणे : शहरासह जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे एन मे महिन्याच्या उन्हाचा चटका वाढण्याएवजी अवकाळी पाऊस धुमाकुळ घालत आहे. शनिवारी (दि. १०) शहर परिसरात ढगाळ वातावरण तर जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस झाला.
राज्यातील कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस तर विदर्भात पाच दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर काही भागात गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे असून, शहर आणि घाट विभागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
परिणामी शहरासह जिल्हयातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून, लोहगांव येथे सर्वाधिक ३९.२, शिरूर येथे ३६.५, मगरपट्टा परिसरात ३६.२, बारामती ३५.९, कोरेगांव पार्क ३५.६, एनडीए ३५.४, पाषाण ३५, दौंड ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.




