पुणे : भारतीय संविधान दिन अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्स असोसिएशन, संविधान फाउंडेशनच्या वतीने आयोजित संविधान सन्मान दौड २०२५ या मिनी मॅरेथॉनमध्ये ८ हजार पुणेकरांसह ४० देशांतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, शैलेश भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, रजिस्टार ज्योती भाकरे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, मॅरथॉन संघटनेचे ऍड. अभय छाजेड, राहुल डंबाळे, दीपक म्हस्के, श्याम गायकवाड, संतोष मदने आदी मान्यवर उपस्थित होते. विजेते – दहा किलोमीटर (पुरुष) – प्रथम- अंकुश हक्के, द्वितीय – तुषार बिन्नर, तृतीय- नीलेश आरसीकर, दहा किलोमीटर (महिला) – प्रथम – साक्षी जाड्याळ, द्वितीय- यामिनी ठाकरे, तृतीय- शीतल तांबे, पाच किलोमीटर (पुरुष) – प्रथम- हर्षद कदम, द्वितीय- अनुपमसिंग सिन्हा, तृतीय- गणेश डोंगरे, पाच किलोमीटर (महिला)- प्रथम- राणी मुचंडी, द्वितीय -साक्षी बोराडे, तृतीय -प्रियंका ओकसा, तीन किलोमीटर (पुरुष)- प्रथम -अजय सिंग, द्वितीय – अभिषेक गुळविले, तृतीय- आदिनाथ साळुंखे, तीन किलोमीटर (महिला) – प्रथम- अनुष्का शिंदे, द्वितीय- आदिती हरगुडे, तृतीय- आदिती तांबे, दिव्यांग व्हीलचेअर- प्रथम- मोहम्मद आलम, द्वितीय- अनिल कच्ची, तृतीय- सुरेश कुमार करकी, चतुर्थ- वाय. निजलिंगे.