pune : घनकचरा विभागात ११५ घंटागाड्या
pune :

pune : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात १५० घंटागाड्या दाखल होणार असून, त्यातील ११५ गाड्या चार दिवसांत दाखल होणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली आहे. याशिवाय ४२ कॉम्पॅक्टर गाड्याही नजीकच्या काळात दाखल होणार असल्याचेही वारुळे यांनी सांगितले.
महापालिका हद्दीत सुमारे दोन हजार २०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचरा संकलन आणि कचरा वाहतूक करून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेच्या वतीने केले जाते.
कचरा वाहतुकीसाठी पालिकेच्या मालकीची ६९८ वाहने आहेत.याशिवाय आवश्यकतेनुसार भाडेतत्त्वावर वाहने घेण्यात येतात.
सध्या घनकचरा विभागाच्या ताफ्यात कचरा संकलनासाठी ८०९ घंटा गाड्या आहेत, तर २०० कॉम्पॅक्टर गाड्या आहेत. ही वाहने कचरा संकलनामध्ये कमी पडत असल्याने उपरोक्त गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.





