Pune : डाळी, साखर स्वस्त तर गुळ महागला

पुणे : मागणी कमी असल्याने डाळी, कडधान्यांचे भाव मंदीतच आहेत. जून महिन्यासाठी मुबलक कोटा जाहीर झाल्याने साखरेच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी घट झाली. तुटवडयामुळे गुळाची दरवाढ सुरुच असून, आठवड्यात दोनशे रुपयांनी वाढले आहेत. तुटवडयामुळे गोटा खोबरे दरातही दहा किलोमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली.
कच्च्या आयात तेलांवरील आयातशुल्क कमी केल्यामुळे खाद्यतेलांचे दर आणखी उतरण्याची शक्यता आहे. पाऊस आणि महिनाअखेरीमुळे घाऊक बाजारात गेल्या आठवडयात ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने उलाढाल कमी झाली. जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरु होत असल्याने वह्या पुस्तकांची खरेदी, फी भरणे याला नागरिक प्राधान्य देतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे या महिन्यात जीवनावश्यक वस्तुंना मागणी कमी असते. त्यातच आयात खाद्यतेलांवरील शुल्क कपातीचा फटका बसला आहे. केंद्राने तेलबियांच्या आधारभूत किंमती क्विंटलमागे पाचशे रुपयांनी वाढ करून तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच कच्च्या आयात खाद्यतेलांवरील आयात शुल्क दहा टक्क्यांनी कमी करुन शेतकऱ्यांना धक्का दिला आहे.
हा निर्णय रिफायनरींना दिलासादायक असला तरी शेतकऱ्यांना मात्र मारक आहे. या निर्णयामुळे कच्चा खाद्यतेलांवर सध्याच्या २७ टक्के ऐवजी १७ टक्के शुल्क लागू होणार आहे. यामुळे सोयाबीन, पामतेल तसेच सुर्यफूल तेलाच्या किंमती निश्चितच कमी होतील. या निर्णयाचे पडसाद शनिवारी घाऊक बाजारावर उमटले नाहीत. पुढील आठवडयात निश्चितच खाद्यतेलांच्या किंमतीवर याचा परिणाम दिसून येईल.
मागणी कमी असल्यामुळे शेंगदाणा तेलांसह सर्वच खाद्यतेलांचे दर सध्या मंदीतच आहेत. खोबरेल तेलाची दरवाढ कायम आहे. केंद्राने जून महिन्यासाठी तेवीस लाख टनाचा कोटा जाहीर केला आहे. या महिन्यात फारसे सण, उत्सव नसल्याने हा कोटा पुरेसा आहे. सध्या बाजारात साखरेस मागणी कमी असल्याने दर मंदीतच आहेत. मध्यंतरी सतत आठ-दहा दिवस पाऊस झाल्याने गुऱ्हाळे पूर्णपणे बंद होती. यामुळे गुळाचे उत्पादन थंडावले असून गुळाची आवक मंदावली आहे. यामुळे तुटवडा निर्माण झाला असून दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली.
गोटा खोबरे महाग
नारळाच्या अपुऱ्या उत्पादनामुळे सध्या गोटा खोबऱ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गोटा खोबऱ्याचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यातही दरात दहा किलोमागे आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. नवीन पीक येण्यास अद्याप बराच अवकाश आहे. भारताच्या शेजारच्या देशांतही सध्या गोटा खोबऱ्याचा तुटवडा असून दर वाढले आहेत, यामुळे आयातही शक्य नाही. यामुळे तूर्त तरी दर तेजीतच राहतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मागणी कमी असल्यामुळे तुरडाळीसह सर्वच डाळी आणि कडधान्यांचे दर मंदीतच आहेत. आवक- जावक कमी असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळाच्या दरात फारसा बदल झाला नाही.
घाऊक बाजारातील दर असे-
साखर(प्रतिक्विंटल) ४०५०-४१०० रु.
खाद्यतेले(१५किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २३००-२३७०, रिफाईंड तेल २१००-२७५०, सरकी तेल
१९५०-२२७५, सोयाबीन तेल १९००-२१५०, पामतेल १९००-२१५०, सूर्यफूल रिफाईंड तेल २०००-
२२२५, वनस्पती तूप २०५०-२३००, खोबरेल तेल ४५५०-४५५० रु.
तांदूळ:- गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसूरी ४५००-५०००, एच.एम.टी.
कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१) -११०००- ११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ९०००-९५००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार
९५००-१०००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९)-८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
गहू- लोकवन नं. १ ४०००-४२००, लोकवन नं. २ ३६००-४०००, नं.३ ३३००-३६००,सिहोर नं. १
५७००-६०००, सिहोर ३५०००-५०००, सिहोरी ३८००-४४००, मिलबर २९००-३००० रु.
ज्वारी:-गावरान नं. १ ५५००-५८००, गावरान नं.२ ४८००-५०००, नं.३ ३५००-३८००, दूरी नं.१
३६००-४०००, दूरीनं.२ ३२००-३५०० रु
बाजरी:-महिको नं.१ ३७००-३८००, महिको नं.२ ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड
३२००-३३०० रु.
गूळ:- गूळ नं.१ ४४००-४५००, गूळ नं.२ ४३००-४३७५ गूळ नं.३ ४२००-४२५०, बॉक्स पॅकिंग ४३००-
५५०० रु.
डाळी:- तूरडाळ ९०००-१०५००, हरभराडाळ ७०००-७१००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ
७५००-७६००, मटकीडाळ ७७००-७८००, उडीदडाळ ९०००-१०५०० रु.
कडधान्ये:-हरभरा ६२००-६४००, हुलगा-५५००-५६०० चवळी ९०००-१२०००, मसूर ७०००-७२००,
मूग ८५००-९३००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात
६०००-६५००, मटकी राजस्थान ६०००-६५००, मटकी सेलम १५०००, वाटाणा हिरवा १००००-
११०००, वाटाणा पांढरा ४२००-४३००, काबुली चणा ७०००-१०००० रु.
साबुदाणा:-साबुदाणा नं.१ ५५००, साबुदाणा नं.२५०००, साबुदाणा नं.३ ४८०० रु.
वरई भगर :-१००००, सावा भगर ९५००,
गोटा खोबरे २४००-२६०० रु.
शेंगदाणा :- जाडा ८१००-८७५०, स्पॅनिश–१०७००,घुंगरु ९०००-९१०० टीजे ७५००रु.
धने:- गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००-१५०००रु.
पोहे :-मध्य प्रदेश ४९००-५१००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४८००-५२००, दगडी पोहा ४८००-
५२००, पातळ पोहा ५६००-६२००, सुपर पोहा ५३००-५७००, भाजका पोहा ६२५-७२५, मका पोहा
६००-७२५, भाजके डाळे ३३००-३९००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५५०-५७०, भडंग ८००-१११०,
घोटी ५३०-५४०रु.
रवा, मैदा, आटा- (५०किलोचा भाव) आटा १७००-१७५०, रवा १७५०-१८००, मैदा १७५०-१८००,
बेसन:- (५०किलोस) ४१५०-४४००रु.
मीठ :- मीठ खडे (५०किलोस) २७५, मीठ दळलेले (५०किलोस) ३००-३२५ रु.
मिरची:-काश्मीरी ढब्बी २५०००-३००००, ब्याडगी १७०००-२००००, लवंगी तेजा १६०००-१७०००,
गुंटूर १४०००-१५०००, खुडवा गुंटूर७०००-८०००, खुडवा ब्याडगीद ८०००-९०००रु.
नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग २०००-२१००, मद्रास ४२००-४५००, पालकोल जुना २२००-
२३००, सापसोल ४२००-४५०० रु.





