Pune : उपयुक्त माहिती असलेल्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

पुणे : या वर्षात (२०२५) प्रत्येकाला उपयोगी दिनदर्शिकेचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही दिनदर्शिका नगरसेवक प्रवीण चोरबेले, माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या वतीने तयार करण्यात आली आहे.
या दिनदर्शिकेत महत्त्वाकांक्षी वेळापत्रक, विविध क्षेत्रांतील मोबाइल नंबर, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध भावमुद्रेतील छायाचित्रांचा समावेश आहे.
याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, क्रीडा व अल्पसंख्याकमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, ईश्वर नहार,आशिष दुगड,राजेंद्र बाठिया, राजेश शहा, पर्वती मतदारसंघातील नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.




