Pune : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; महिलेला अटक
Updated On:

पुणे – घरगुती आयुर्वेदिक मसाज सेंटच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका 50 वर्षाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गंगाधन घावटे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील संतोषनगर परिसरात एका महिला घरामध्ये तरुणींकडून आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाला पाठविले.
त्यानंतर तेथे छापा टाकल्यावर ही महिला पालघर येथील एका २२ वर्षाच्या तरुणीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर अधिक तपास करीत आहेत.





