Pune : साखर, गुळाची दरवाढ; हिरवा वाटाणा घसरला

पुणे : उन्हाचा कडाका वाढल्याने शीतपेयांच्या खपात वाढ झाली आहे. परिणामी साखर आणि गुळाला मागणी वाढली आहे. साखरेच्या क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे, तर गुळाचे भावही तेजीत आहेत. आठवडाभरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली. मात्र, आवक वाढल्यामुळे हिरव्या वाटाण्याच्या दरात आणखी मोठी घसरण होऊन भाव नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. मागणीअभावी खाद्यतेलांच्या भावातही किरकोळ घसरण झाल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले.
उत्तर प्रदेश येथून नव्या हिरव्या वाटाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे आणखी एक हजार ते पंधराशे रुपयांची घसरण झाली. पांढऱ्या वाटाण्याची आवक कमी प्रमाणात होत असून, दरात क्विंटलमागे आणखी २०० रुपयांनी वाढ झाली. काबुली चण्याचीही आवक वाढत असल्याने दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. आवक जावक कमी असल्यामुळे तूरडाळ, मटकी, मसूर, तसेच उडीदडाळीचे दर स्थिर होते. चवळी, मटकी, मूग, मसूर या कडधान्यांचे दर स्थिर होते. मागणी कमी असल्यामुळे हरभराडाळीच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी घट झाली. त्यामुळे बेसन दरातही ५० किलोमागे पन्नास रुपयांनी घट झाल्याचे सांगण्यात आले.
नव्या गहू आणि गावरान ज्वारीची आवक वाढत आहे. मागणीही चांगली असल्याने दर मात्र स्थिर आहेत. तांदळाचे दरही टिकून आहेत. गुळास मागणी चांगली असून, उसाच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळे बंद होत आहेत. त्यामुळे गुळाची आवक कमी प्रमाणात होत आहे. परिणामी गुळाचे दरही तेजीतच असून, गेल्या आठवड्यातही दरात क्विंटलमागे आणखी ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली. सध्या खाद्यतेलांना मागणी कमी आहे. यामुळे गेल्या आठवड्यात सरकी आणि सोयाबीन तेलाच्या दरात १५ किलोच्या डब्यामागे १५ ते २० रुपयांनी घट झाली आहे. मात्र, शेंगदाणा तेलांसह अन्य सर्वच खाद्यतेलांचे दर स्थिर होते. वनस्पती तूप आणि खोबरेल तेलाचे दरही स्थिर होते.
येथील घाऊक बाजारातील दर पुढील प्रमाणे–
साखर (प्रतिक्विंटल) ४१५०-४२०० रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २४००-२५००, रिफाइंड तेल २१५०-२७५०, सरकी तेल २०००-२३००, सोयाबीन तेल २०००-२३००, पामतेल २०००-२२५०, सूर्यफूल रिफाइंड तेल २१५०- २३००, वनस्पती तूप २२००-२४००, खोबरेल तेल ३९०० रु.
तांदूळ :- गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसुरी ४५००-५०००, एचएमटी कोलम ५५००- ६५००, लचकारी कोलम ६५००- ७०००, चिन्नोर ४५००- ५०००, (११२१) -११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) ९०००- ९५००, बासमती अखंड १२०००- १३०००, बासमती दुबार ९५००-१०००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९)- ८५००-९५००, इंद्रायणी ५५००- ६००० रु.
गहू – लोकवन नं. १- ४४००-४५००, लोकवन नं. २- ३९००-४२००, नं. ३- ३४००-३६००, सिहोर नं. १ ५७००- ६०००, सिहोर नं. २ – ३५००० – ५०००, सिहोरी ४०००-४४००, मिलबर ३५०० रु.
ज्वारी :- गावरान नं. १ – ५२००-५५००, गावरान नं. २- ४५००-४८००, नं. ३- ३५००-३८००, दुरी नं. १- ३६००-४०००, दुरी नं. २- ३२००- ३५०० रु
बाजरी :-महिको नं. १- ३७००-३८००, महिको नंं. २- ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड ३२००-३३०० रु.
गूळ:- गूळ एक्स्ट्रा ४१५०-४३००, गूळ नं. १- ३९००-४१००, गूळ नं. २- ३७२५-३८५० गूळ नं. ३- ३६००- ३७००, नं. ४- ३५००- ३५७५, कऱ्हाड बॉक्स पॅकिंग ४६००-५२००, केडगाव बॉक्स पॅकिंग ३७००- ४२०० रु.
डाळी :- तूरडाळ १००००-१२०००, हरभरा डाळ ६८००-७०००, मूगडाळ ९०००-१०२००, मसूरडाळ ७६००-७७००, मटकी डाळ ८२००-८३००, उडीद डाळ १००००-११००० रु.
कडधान्ये :- हरभरा ६५००-७०००, हुलगा-५५००-५६०० चवळी ७५००- १२०००, मसूर ६८००-६९००, मूग ८५००-९३००, मटकी गावरान ७५००-८०००, मटकी पॉलिश ६०००-६६००, मटकी गुजरात ६०००- ६५००, मटकी राजस्थान ६०००- ६५००, मटकी सेलम १०००-१०५००, वाटाणा हिरवा ८५००-९०००, वाटाणा पांढरा ४८००-५०००, काबुली चणा ८०००-११००० रु.
साबुदाणा :- साबुदाणा नं. १- ५५००, साबुदाणा नं. २- ५०००, साबुदाणा नं. ३- ४८०० रु.
वरई भगर : – १००००, सावा भगर ९५००, गोटा खोबरे १७००-१९०० रु.
शेंगदाणा :- जाडा ८१००-८७००, स्पॅनिश–१००००-१०५००, घुंगरू ८४००-८५०० टीजे ७००० रु.
धने:- गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००-१५००० रु.
पोहे :- मध्य प्रदेश ४७००-५०००, पेण ४३००-४५००, मध्यम पोहा ४७००-४९००, दगडी पोहा ४७००- ५१००, पातळ पोहा ५०००-५८००, सुपर पोहा ५३००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ६२५-७२५, भाजके डाळे ३६००- ४०००, मुरमुरा सुरती (९ किलोस) ५६०, भडंग ९००-१०५०, घोटी ५५० रु.
रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा १९००-१९५०, रवा १९५०-२०००, मैदा १९५०-२००० रु.
बेसन :- (५० किलोस) ४१५०-४४५० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरची :- काश्मिरी ढब्बी २५०००-३००००, ब्याडगी १७०००-२००००, लवंगी तेजा १६०००-१७०००, गुंटूर १५००-१६०००, खुडवा गंटूर ७०००-८०००, खुडवा ब्याडगी ८०००-९००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग २०००-२१००, मद्रास ३८००-३९००, पालकोल जुना २१००- २२००, सापसोल ३८००- ३९०० रु.




