PUNE: विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक अविष्कारांचे सादरीकरण

पुणे – वेस्ट टू वेल्थ, झिरो गारबेज सिस्टिम, इलेक्ट्रिसिटी जनरेशन यांसह डिझास्टर मॅनेजमेंट, पर्यावरणाच्या समस्या व उपाय, टेक्नॉलॉजी इन बायो मेडिकल एरिया, रोबोटिक्स अशा विविध विषयांवर पाचव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हलमध्ये शालेय व महाविद्यालयीने विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक अविष्कारांचे सादरीकरण केले. सायन्स सोसायटी आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत आयोजित विज्ञान महोत्सवात राज्यभरातून विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
नऱ्हेच्या शैक्षणिक संकुलात आयोजित सायन्स महोत्सवात शास्त्रज्ञ डॉ. अतर सिंग पिपल, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. महोत्सवामधील स्पर्धा चार गटात पार पडली. विद्यार्थ्यांनी पॉल्युशन कंट्रोल, फ्री एनर्जी जनरेशन, इनोव्हेशन स्किल इन हेल्थ, विशेष व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी इन इंडस्ट्री, अशा विविध संकल्पनांवर प्रकल्पाचे सादरीकरण केले.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिवल’ मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळाले. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी दिली जाणार आहे.





