“शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं…” ; पुणे अपघात प्रकरणातील आरोपी डॉक्टरची थेट धमकी

Pune Porsche Car Accident। पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात ससून रुग्णालयातील तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली. दरम्यान, अटकेत असणाऱ्या ससूनमधील आरोपींपैकी एक डॉ. अजय तावरे याने प्रकरणातील इतरांचीही नावं समोर आणणार असल्याची थेट धमकी दिलीय.
आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोपाखाली डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीय. नमुन्यांमध्ये फेरफार करण्यासाठी आरोपींनी लाखो रुपयांची लाच घेतल्याचंही समोर आलंय. त्यामुळे आता हे प्रकरण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालयातील अटक आरोपीने इतरही नावं उघड करण्याची धमकी दिली आहे.
“शांत बसणार नाही” Pune Porsche Car Accident।
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ससून रुग्णालयातून अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी आरोपी डॉ. अजय तावरेनं हा धमकीवजा इशारा दिला आहे. “मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, असं अजय तावरेनं म्हटल्याचं या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. सध्या ससून रुग्णालयातून अटक केलेले तिधे आरोपी पोलीस कोठडीत असून सोमवारी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३० मे पर्यंत वाढ केली आहे.
आरोपीच्या ररक्ताच्या नमुन्यात फेरफार Pune Porsche Car Accident।
कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयातच वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यासाठी आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्या नमुन्यांच्या आधारेच आरोपीनं मद्यसेवन न केल्याचा अहवालही तयार करण्यात आला होता. मात्र, अल्पवयीन आरोपीनं मद्यसेवन केल्याचं सीसीटीव्ही अपघाताच्या आधीच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं. यानंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि संबंधित डॉक्टरांची चौकशी केली असता आरोपीच्या ररक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याची धक्कादायक बाब समोर आली.





