Pune : नवले पुलावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये (कलम ८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्योती हुलावळे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला थांबतात. त्या अश्लील हावभाव करतात, तेथून जाणारे नागरिक, वाहनचालकांना इशारे करतात, अशा तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी नवले पूल परिसरात थांबणाऱ्या तीन महिलांविरुद्ध कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निंबाळकर तपास करीत आहेत. यापूर्वीसुद्धा नागरिकांच्या तक्रारीनंतर येथे कारवाई केली होती, परंतु पुन्हा तसाच प्रकार सुरू झाला. नवले पूल परिसरात थांबणाऱ्या महिलांमुळे वाहतुकीस अडथळा होतो. तसेच, नवले पूल सेवा रस्ता परिसरात गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत.





