Kasba by-elections: पोलिस अलर्ट मोडवर, गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष, निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या मागवल्या
Updated On:

पुणे – कसबापेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस देखील अलर्ट झाले असून, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाते आहे. याबाबत पोलिस आयुक्तालयात दोन दिवसापुर्वी पोलिस आयुक्त रितेशकुमारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस ठाण्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. काही भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडून मतदानासाठी नागरिकांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी बाहेरच्या पाच निमलष्करी दलाच्या पाच तुकड्या मागवल्या आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त रितेशकुमारांनी दिली.





