PNG Exclusive Special offer: गुढीपाडव्याला करा दागिन्यांची खरेदी; पीएनजी एक्सक्लूसिव्हची खास ऑफर

पुणे – गुढीपाडवा म्हणजे नववर्षाचं स्वागत आणि मौल्यवान दागिन्यांच्या खरेदीचा शुभ मुहूर्त. यंदा पीएनजी एक्सक्लूसिव्हने गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर जाहीर केली आहे, त्यामुळे तुमचा खरेदीचा आनंद दुप्पट होणार आहे. सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांवरील घडणावळीवर मोठी सूट देऊन पीएनजी ग्राहकांना आकर्षित करत आहे.
दागिन्यांवर बंपर सवलत –
परंपरेनुसार, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला दागिने खरेदीला विशेष महत्त्व आहे. पीएनजी एक्सक्लूसिव्हने 28 ते 30 मार्च 2025 या कालावधीत खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% सूट, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर 50% आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर 30% सूट मिळणार आहे.
ही ऑफर एरंडवणा येथील पीएनजी एक्सक्लूसिव्हच्या नळ स्टॉप दालन (निसर्ग हॉटेल लेन) व पणजी येथील कामत एलिट (संत इनेझ मार्ग) दालनात उपलब्ध असून, ऑफरबाबत नियम व अटी संस्थेने राखीव ठेवल्या आहेत.
प्रत्येकाच्या आवडीसाठी खास डिझाइन्स –
ग्राहकांच्या मागणी आणि बजेटचा विचार करून पीएनजीने विविध प्रकारचे दागिने उपलब्ध केले आहेत. यात टेम्पल (गोकाक), कलकत्ती, महाराष्ट्रीयन स्टाइलमधील लाइटवेट दागिने तसेच डिझायनर पेंडंट सेट, नेकपीस आणि इअरिंग्सचा समावेश आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र पेंडंट, नेकलेस, इअरिंग्स आणि पेंडंट सेट यांची आकर्षक आणि नाविन्यपूर्ण डिझाइन्स पाहायला मिळतील.
गुढीपाडव्यासारख्या शुभ प्रसंगी तुमच्या आवडीचे दागिने घेण्यासाठी ही ऑफर म्हणजे सुवर्णसंधी आहे.



