“पीएमआरडीए’ मेट्रो दिल्ली दरबारी

पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात घेणार आहेत. यात केंद्र सरकारच्या हिश्श्याचा सुमारे 1 हजार 200 कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
“पीएमआरडीए’ने या 23 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. यासाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कल्पास आवश्यक सर्व प्रकाराची मंजुरी राज्य सरकारने दिली आहे.
हा प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्यात येणार असला, तरी त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 20 टक्के, तर संबंधित कंपनी 60 टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे “व्हायबल गॅप फंडिंग’च्या स्वरूपात केंद्रारकडून 1,200 कोटी रुपयांचा निधी द्वावा, असा प्रस्ताव “पीएमआरडीए’ने चार महिन्यांपूर्वीच पाठवला. त्यात केंद्र सरकारने त्रुटी काढल्या होत्या. आत प्रस्तावात सुधारणा करून “पीएमआरडीए’ने तो मान्यतेसाठी पाठवला आहे.





