Pune : ससूनच्या टेरेसवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या
Updated On:

पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणाची बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दशरथ सुरेश मेढे (३१, रा. राजूर ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी सांगितले की, मेढे हा गुरुवारी रात्री मद्य पिऊन वेड्यासारखे करीत होता.
यामुळे नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तो वॉर्ड क्रमांक ४० मध्ये उपचार घेत होता. सकाळी त्याने टेरेसवरून उडी मारली, यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.





