पुणे : कायदेविषक जनजागृती शिबिराचे आयोजन

पुणे – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि हिंजवडी ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त “पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंजवडी येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख उपस्थित होते. त्यांचा सन्मान हिंजवडीचे सरपंच विक्रम साखरे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य तसेच संत तुकाराम सहकारी कारखान्याचे माजी संचालक वसंतराव साखरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत मुळशी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. अंकुश ववले यांनी केले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ डॉ. सुधाकरराव आव्हाड यांनी “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रारुप विकास आराखडा : आरक्षणे व झोनिंग’ संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. पांडुरंग थोरवे यांनी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या “सरकारी मोजणी व त्यासंबंधीत महत्त्वाची परिपत्रके’ या विषयावर लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
संजय देशमुख यांनी “विधी साक्षरता अभियान अंतर्गत पॅन इंडिया तसेच महिलांचे अधिकार’ या विषयावर विचार व्यक्त केले. यावेळी हिंजवडीचे सरपंच विक्रम वसंतराव साखरे, उपसरपंच प्रतिक्षा शिवाजी घोटकुले यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजक ऍड. पांडुरंग थोरवे संस्थापक अध्यक्ष विधीनिती प्रतिष्ठान यांचेवतीने ऍड. संतोष जाधव, ऍड. पुनम शेलार, तसेच ऍड. सुशांत पोतले यांनी केला. मुळशी बार असोसिएशन व दुय्यम निबंधक हिंजवडी येथील ऍड. राक्षे, ऍड. श्रीकांत बुचुडे, ऍड. नीलेश जांभुळकर यांचाही सन्मान करण्यात आला.
तसेच, पिंपरी चिंचवड बार असोसिएशन नवनिर्वाचित सचिव म्हणून निखिल बोडके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍड.संतोषजी जाधव, रुपेश कलाटे, ऍड. कल्याण शिंदे, ऍड. अमित आव्हाड, ऍड. समीर भुंडे, ऍड. माणिक रायकर, ऍड. चंद्रकात दगडे, ऍड. वर्षा मुरकुटे, ऍड. सई जोशी, ऍड. श्रद्धा जाधव, ऍड. अमोल नखाते, ऍड. प्रमोद नढे यांच्यासह वकील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे सचिव ऍड. प्रविण नलवडे यांनी केले आहे.





