Pune News : ‘काॅग्रेस नेत्यांवरील आरोप चूकीचे’ – गोपाळ तिवारी

Pune News : तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी काँग्रेसने सतत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डावलण्याची भूमिका घेतली. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोप चूकीचे असल्याची टिका काॅग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली, काॅग्रेसचे ज्येष्ट पदाधिकारी सुभाष थोरवे, उमेश चाचर, रामचंद्र उर्फ भाऊ शेडगे , भोला वांजळे, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, राजेश सुतार, गणेश शिंदे यावेळी उपस्थित होते.
तिवारी म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींनी अशी विधाने करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. ज्या काँग्रेसने मुंबईतुन बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेऊन डॉ. आंबेडकर यांना लोकसभेत पाठवले व सन्मानाने घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष केले या सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभव केल्याचा आरोपही काँग्रेसवर केला जातो.
मात्र, या आरोपाला कोणताच अर्थ नसल्याचेही सांगत डॉ आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये यावे असा काँग्रेसचा नेहमीच प्रयत्न राहिला. मात्र, डॉ आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन आणि नंतर आरपीआय च्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र राजकिय पक्षाचे अस्तित्व निर्माण केले. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.





